कृषी व प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण मध्ये गोवा माजी उद्योगमंत्री श्री. दिलीप परूळेकर याची निवड झाल्याची घोषणा या अपेडा संस्थेने केली आहे.

भारत सरकारने वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत संसदेच्या कायद्याद्वारे अपेडा (APEDA) ची स्थापना केली आहे.

या सस्थेने आपल्या ३७ वर्षाच्या कालावधीत यशस्वी प्रवासात कृषी उत्पादनाच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यात अभूतपूर्व यश मिळविले आहे.

निर्यातीला चालना देण्यासाठी अपेडा विविध आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल माहिती संकलित करून या बाजारपेठेत निर्यातदारांना प्रवेश करण्यासाठी आवश्यक ती माहिती आणि व्यापारी चौकशीचे पत्ते अपेडा प्रकाशित करते.

माजी पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांची अपेडावर नियुक्ती झाल्याबद्दल गोव्यात त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

श्री. परुळेकर हे भाजपा गोवा प्रदेश उपाध्यक्षपदी आहे. श्री. दिलीप परुळेकर पर्यटन मंत्री असताना त्याने पर्यटन क्षेत्रात महत्वपूर्ण बदल आणला होता .

पर्यटन क्षेत्राला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता म्हणूनच त्याला “पाटवा” कंपनीने इनव्हेटिव्ह पर्यटन मंत्री म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केला होता. त्याचबरोबर बेस्ट टुरिझम मंत्री आही एक किताब देऊन त्याला सन्मानित केला आहे .

शेतकरी कुटुंबात जन्मलेला श्री परुळेकर खऱ्या अर्थाने शेती कसणारा शेतकरी म्हणून त्याची ओळख आहे. याच कारणास्तव त्याची दखल केंद्र सरकारने घेऊन त्यांना अपेडा या महत्त्वाच्या संस्थेवर नेमणूक झाल्याची बोलले जात आहे.

जागतिक बाजरी परिषदे दरम्यान खरेदीदार विक्रेता बाजरीसह प्रदर्शनाचे आयोजन 18 मार्च 2023 दिल्ली येथे होणार आहे .

या जागतिक बाजरी परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे. प्रथम सत्रात त्यांच्या शुभहस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे.
या परिषदेला एकूण ७२ राष्ट्राचे प्रतिदिनी उपस्थित राहणार आहे.

या कार्यक्रमाला श्री. परूळेकर उपस्थित राहणार आहे. तत्पूर्वी दिनांक ५ मार्च 2023 रोजी दिल्ली येथे आयोजित केलेली “बाजरी स्मार्ट पौष्टिक अन्न” या आमंत्रित केलेल्या गुप्त बैठकीला श्री. परुळेकर उपस्थित होते

Spread the love

By Goa9